संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाजशिक्षक- संजय देशमुख*


 *संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाजशिक्षक- संजय देशमुख* 


 **कै.ल.दे .महिला महाविद्यालयात 'संत गाडगेबाबांची जयंती 'साजरी* 


   परळी , दि 23/02/2022 (प्रतिनिधी )

येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ. संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या हार्षोल्हासात संपन्न करण्यात आली. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी "संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाज शिक्षक होते. ते दिवसा खराटा हातात घेऊन ग्रामस्वच्छता करत असत व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या मनातील घाण साफ करून समाजप्रबोधन करत असत.समाज मनाचं आरोग्य समृद्ध करण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे. त्यांचे विचार आज समाजामध्ये रुजवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल." असे  मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय सचिव रवींद्रजी देशमुख ,प्राचार्य डॉ . एल . एस .मुंडे ,श्री.उत्तमराव चव्हाण , श्री.गोपाळराव देशमुख,प्रा.डॉ.विवेकानंद कवडे , प्रा.डॉ.प्रवीण दिग्रसकर , श्री प्रमोद पत्की  यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस .एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ .पी व्ही गुट्टे ;सहकार्यक्रमाधिकारी प्रा. आर.एल .जोशी,प्रा.रंजना शहाणे,प्रा.कल्याणकर,श्री.मारोती देमगुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  प्रा.पी .व्ही . गुट्टे  यांनी  केले . कार्यक्रमास कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कै.ल .दे.महिला महाविद्यालयात ' भाषा वाङ्‌मय मंडळाचे उद्‌घाटन '*

*कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान '*