विश्वात। तयांची। नसे कुणा सर ।माता-पिता थोर। देवाहूनी ।।..
* कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या एन.एस.एस. शिबिरात निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न* * कवी अरुण पवार , दिवाकर जोशी , सिद्धेश्वर इंगोले यांच्या कवितेने रंगत आणली.* परळी , दि 25/03/2022 (प्रतिनिधी ) कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथचे एन. एस. एस. शिबीर मिरवट येथे चालू आहे. संस्थेचे अध्यक्ष , मा. संजय देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष - प्रा.प्रसाद देशमुख , प्राचार्य डॉ. एल . एस . मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या या एन.एस.एस. शिबिराच्याअंतर्गत आज दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित केले होते. त्यात कवी अरुण पवार ,दिवाकर जोशी ,सिद्धेश्वर इंगोले या कवींनी सहभाग नोंदविला.आपल्या गोड गळ्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेल्या कवी अरुण पवार यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून हास्याचे तुषार उडवत उडवत अंतर्मुख करायला लावणाऱ्या सामाजिक कविताही सादर केल्या. ' पांढरं सोनं पिकवलं का मातीमोल विकू मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू ' या त्यांच्या ...