संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाजशिक्षक- संजय देशमुख*
* संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाजशिक्षक- संजय देशमुख* **कै.ल.दे .महिला महाविद्यालयात 'संत गाडगेबाबांची जयंती 'साजरी* परळी , दि 23/02/2022 (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ. संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या हार्षोल्हासात संपन्न करण्यात आली. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी "संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाज शिक्षक होते. ते दिवसा खराटा हातात घेऊन ग्रामस्वच्छता करत असत व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या मनातील घाण साफ करून समाजप्रबोधन करत असत.समाज मनाचं आरोग्य समृद्ध करण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे. त्यांचे विचार आज समाजामध्ये रुजवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल." असे मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय सचिव रवींद्रजी देशमुख ,प्राचार्य डॉ . एल . एस .मुंडे ,श्री.उत्तमराव चव्हाण , श्री.गोपाळराव देशमुख,प्रा.डॉ.विवेकानंद कवडे , प्रा.डॉ.प्रवीण दिग्रसकर ,...