Posts

विश्वात। तयांची। नसे कुणा सर ।माता-पिता थोर। देवाहूनी ।।..

Image
 * कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या एन.एस.एस. शिबिरात निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न*   * कवी अरुण पवार , दिवाकर जोशी , सिद्धेश्वर इंगोले यांच्या कवितेने रंगत आणली.*        परळी , दि 25/03/2022 (प्रतिनिधी ) कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथचे एन. एस. एस. शिबीर मिरवट येथे चालू आहे. संस्थेचे अध्यक्ष , मा. संजय देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष - प्रा.प्रसाद देशमुख , प्राचार्य डॉ. एल . एस . मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या या एन.एस.एस. शिबिराच्याअंतर्गत आज  दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे  कविसंमेलन आयोजित केले होते. त्यात कवी अरुण पवार ,दिवाकर जोशी ,सिद्धेश्वर इंगोले या कवींनी सहभाग नोंदविला.आपल्या गोड गळ्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेल्या कवी अरुण पवार यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून हास्याचे तुषार उडवत उडवत अंतर्मुख करायला लावणाऱ्या सामाजिक कविताही सादर केल्या. ' पांढरं सोनं पिकवलं का मातीमोल विकू  मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू '     या त्यांच्या ...

*कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान '*

 * " *समतेबरोबरच स्त्रियांना हक्क बहाल केले तर त्या हमखास वि* " *समतेबरोबरच स्त्रियांना हक्क बहाल केले तर त्या हमखास विविध क्षेत्रात अग्रेसर राहतील* " - संजय देशमुख*   *कै.ल.दे .महिला महाविद्यालयात ' महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान '*     परळी , दि 08/03/2022 (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम मोठ्या हार्षोल्हासात साजरा करण्यात आला. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांच्या शुभहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय चालतं त्या स्व. लक्ष्मीबाई देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी " स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याबरोबरच त्यांचे हक्क त्यांना बहाल केले तरच त्या विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करतील. त्या आपल्या कार्यातून निश्चितच सर्वांना निर्भेळ आनंद देतील. " असे  मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय संचालिका छायाताई देशमुख , संचालिका प्रा.डॉ. विद्य...

संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाजशिक्षक- संजय देशमुख*

Image
 * संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाजशिक्षक- संजय देशमुख*    **कै.ल.दे .महिला महाविद्यालयात 'संत गाडगेबाबांची जयंती 'साजरी*     परळी , दि 23/02/2022 (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ. संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या हार्षोल्हासात संपन्न करण्यात आली. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी "संत गाडगेबाबा म्हणजे चालते-फिरते समाज शिक्षक होते. ते दिवसा खराटा हातात घेऊन ग्रामस्वच्छता करत असत व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या मनातील घाण साफ करून समाजप्रबोधन करत असत.समाज मनाचं आरोग्य समृद्ध करण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे. त्यांचे विचार आज समाजामध्ये रुजवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल." असे  मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय सचिव रवींद्रजी देशमुख ,प्राचार्य डॉ . एल . एस .मुंडे ,श्री.उत्तमराव चव्हाण , श्री.गोपाळराव देशमुख,प्रा.डॉ.विवेकानंद कवडे , प्रा.डॉ.प्रवीण दिग्रसकर ,...

कै.ल .दे.महिला महाविद्यालयात ' भाषा वाङ्‌मय मंडळाचे उद्‌घाटन '*

 * मातीशी नाळ घट्ट असेल तर सांस्कृतिक अभिसरण सुलभ - प्रा.शंकर राठोड*  * सौंदर्यशील  सृजननिर्मिती साठी भाषा वाङ्‌मय मंडळाची आवश्यकता - संजय देशमुख*  * परळी , दि . ०६ /०२ /२०२२    येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील 'भाषा वाङ्‌मय मंडळाच्या उद्घाटन ' प्रसंगी आपल्या विचारांची पेरणी करताना सुप्रसिद्ध वक्ते तथा कवी प्रा.शंकर राठोड यांनी "मातीशी नाळ घट्ट असेल तर सांस्कृतिक अभिसरण सुलभ होते. "असे मत मांडले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय संजय देशमुख हे होते त्यांनी " सौंदर्यशील सर्जन निर्मितीसाठी भाषा वाङ्‌मय मंडळाची आवश्यकता असते. " असे आपले मत यावेळी प्रतिपादन केले. तर प्राचार्य डॉ.एल. एस. मुंडे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात " विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी करण्याकरिता असे उपक्रम उपयुक्त पडतात . " असे मत मांडले . संस्थाध्यक्ष - संजय देशमुख , सचिव-रवींद्र देशमुख , कोषाध्याक्ष - प्रा.प्रसाद देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम संपन्न झाला .        प्रा.शंकर राठोड यांनी याप्रसंगी - "भाकर मातीची खातो  गाणं भी ...