कै.ल .दे.महिला महाविद्यालयात ' भाषा वाङ्मय मंडळाचे उद्घाटन '*
*मातीशी नाळ घट्ट असेल तर सांस्कृतिक अभिसरण सुलभ - प्रा.शंकर राठोड*
*सौंदर्यशील सृजननिर्मिती साठी भाषा वाङ्मय मंडळाची आवश्यकता - संजय देशमुख*
*
परळी , दि . ०६ /०२ /२०२२
येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील 'भाषा वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन ' प्रसंगी आपल्या विचारांची पेरणी करताना सुप्रसिद्ध वक्ते तथा कवी प्रा.शंकर राठोड यांनी "मातीशी नाळ घट्ट असेल तर सांस्कृतिक अभिसरण सुलभ होते. "असे मत मांडले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय संजय देशमुख हे होते त्यांनी " सौंदर्यशील सर्जन निर्मितीसाठी भाषा वाङ्मय मंडळाची आवश्यकता असते. " असे आपले मत यावेळी प्रतिपादन केले. तर प्राचार्य डॉ.एल. एस. मुंडे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात " विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी करण्याकरिता असे उपक्रम उपयुक्त पडतात . " असे मत मांडले . संस्थाध्यक्ष - संजय देशमुख , सचिव-रवींद्र देशमुख , कोषाध्याक्ष - प्रा.प्रसाद देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम संपन्न झाला .
प्रा.शंकर राठोड यांनी याप्रसंगी -
"भाकर मातीची खातो
गाणं भी मातीचं गातो
कुठं हाव हाय आम्हाला बिसलरी घाम पाण्यात मिसळून पितो. "
या कवितेबरोबरच 'माय ' , 'मराठी भाषा ' , ' शेतकरी ' यासारख्या विविध विषयावर दर्जेदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कवितेने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .
याप्रसंगी भाषा वाङ्मय मंडळातील पदाधिकारी व सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.मराठीभाषा वाङ्मय मंडळाचे प्रभारी - प्रिया बळवंत -अध्यक्ष ,पुनम येणगे - सचिव ,आकांक्षा शिंदे -उपाध्यक्ष ; हिंदी भाषा साहित्य मंडळाचे पदाधिकारी गायत्री डुबे - अध्यक्ष , अंजली लटपटे - सचिव , सीता लोखंडे - उपाध्यक्ष ; संस्कृत भाषा साहित्य मंडळाचे पदाधिकारी - ऐश्वर्या गायकवाड - अध्यक्ष , माधुरी बडे - सचिव ,अबोली मोगरकर- उपाध्यक्ष ; इंग्रजी भाषा वाङ्मय मंडळाचे पदाधिकारी - असिफा खान -अध्यक्ष , पल्लवी यादव - सचिव ,मेघा आव्हाड - उपाध्यक्ष त्याचप्रमाणे वाङ्मय मंडळातील इतर पदाधिकार्यांचा परिचय प्रा. कल्याणकर आर.बी. यांनी करून दिला तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. शिवनारायण वाघमारे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी तर आभारप्रकटन प्रा.डॉ.अरुण चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ,डॉ.एल.एस.मुंडे , प्रा. डॉ. पूर्वा अर्धापुरे, प्रा. डॉ . राजकुमार यल्लावाड , प्रा.कल्याणकर आर. बी. , प्रा. डॉ .श्याम नेरकर, प्रा. डॉ.अरुण चव्हाण , प्रा.डॉ.शिवनारायण वाघमारे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment